Crime News | मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन महिलेला भररस्त्यात लुटलं

वाराणसी : वृत्तसंस्था – Crime News | उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये (Uttar Pradesh Varanasi) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बोगस पोलीस बनून चोरी झाल्याच्या घटना आपणाला माहिती (Crime News) आहे. मात्र आता एक अशी घटना समोर आली आहे की चोरट्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन महिलेला लुटलं आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीला चाप लागल्याचा भाजपचा दावा खोटा ठरला आहे. राज्यात दररोज अशा घटना घडू लागल्याने या दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, आणखी एका घटनेमध्ये चोरट्यांची पोलीस बनून महिलेचे दागिने लंपास केले आहेत.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालती उपाध्याय (Malati Upadhyay) या भेलपूरमध्ये वास्तव्यास आहेत. 28 मार्चला त्या बँकेतून पैसे काढायला निघाल्या होत्या. उपाध्याय या बँकेजवळ पोहोचताच दुचाकीवरून दोन तरूण तेथे आले. त्यांनी बँकेत जात असताना उपाध्याय यांना रोखलं. सोन्याचे दागिने परिधान केलेल्यांना तातडीने ते उतरवण्यास सांगा असे योगींचा आदेश असल्याचे सांगत दोघांनी सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी काढून घेतल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्हींच्या (CCTV) आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक रमाकांत दुबेंनी (Police Inspector Ramakant Dubey) दिलेल्या माहितीनुसार लवकरच या चोरट्यांना गजाआड करण्यात येणार असल्याचे सांगितले. (Crime News)

दरम्यान, 28 मार्चलाच चोरीची आणखी एक घटना शिवपूरमध्ये (Shivpur) घडली आहे. यामध्ये पोलीस असल्याचे सांगून महिलेचे दागिने लंपास केले आहे.
निर्मला देवी (Nirmala Devi) या मंदिरात निघाल्या होत्या. त्यावेळी पोलिसाच्या गणवेशात एका चोरट्याने त्यांचा रस्ता अडवला. परिस्थिती चांगली नाही.
सोन्याची चेन पिशवीत ठेवा असे त्याने सांगितले. निर्मला देवी यांनी चेन काढत ती कागदात बांधून दिली.
दरम्यान, हातचालाखी करत ही चेन स्वत:च्या खिशात टाकली. घरी गेल्यानंतर निर्मला देवी यांनी कागद उघडून पाहिले
तर त्यात चेन नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

 

Web Title :- Crime News | uttar pradesh robbers take off gold jewellery from old woman saying its cm yogis order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत येरवडा येथील मुळीक कॉम्प्लेक्स मध्ये वाहनांची तोडफोड, तरुणावर वार; 4 जणांवर FIR

 

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

Chris Rock On Will Smith Slap Controversy | विल स्मिथच्या ‘गालफटा’वर अखेर क्रिस रॉकनं तोडलं मौन; म्हणाला – ‘मी अजून विचार करतोय नक्की काय झालं होत?’