Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्यासोबत नोकरदार पत्नी फरार
पाटणा : Crime News | बिहारमध्ये एका महिलेवर 39 लाख रुपये घेवून फरार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे पैसे पतीने तिच्या खात्यात जमीन विकून जमा केले होते. आरोप आहे की, पत्नी केवळ 11 रुपये ठेवून आपल्या शेजार्यासोबत पळून (Crime News) गेली आहे. फरार महिला दोन मुलांची आई आहे. पतीने शहरात जमीन घेण्यासाठी ते पैसे सांभाळून ठेवले होते.
पोलिसात केली तक्रार
माहितीनुसार, पतीने आपली वारसागत मालमत्ता विकून शहरात घर बांधण्यासाठी 39 लाख रुपये जमा केले होते. आता पतीने पोलिसात तक्रार केली आहे.
दोघांना दोन अपत्ये
बिहटा कौडिया येथे राहणार्या बृजकिशोर सिंहचा विवाह 14 वर्षापूर्वी भोजपुरच्या बिंदगावा येथील प्रभावती देवीसोबत झाला होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या
पती गुजरातमध्ये करत होता नोकरी
बृज किशोर सिंहने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गावापासून वेगळे बिहटात भाड्याने घर घेतले होते. येथे प्रभावती देवी आपल्या मुलांसोबत राहात होती. बृज किशोर घरखर्च चालवण्यासाठी गुजरातला जाऊन एक प्रायव्हेट नोकरी करत होता.
पत्नीने प्रियकराच्या खात्यात ट्रान्सफर केले पैसे
बृज किशोरने सांगितले की, पत्नीच्या सांगण्यावरून त्याने आपली वारसागत मालमत्ता विकून 39 लाख रुपये पत्नीच्या खात्यात जमा केले होते. 1 आठवड्यापूर्वी पत्नीच्या सांगण्यावरूनच तो गुजरातहून घरी आला.
पहाटेच घर सोडून पळाली
परंतु जेव्हा तो गावातील घरातून भाड्याने घेतलेल्या घरी पोहचला तेव्हा टाळा होता. पत्नीला फोन केला तर तिचा नंबर बंद होता. घरमालकाला विचारल्यावर समजले की, प्रभावती सकाळी 5:00 वाजता घर खाली करून निघून गेली आहे. बृज किशोरने पत्नीला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच शोध लागला नाही. अखेर त्याने पोलिसात तक्रार केली.
प्रियकराला दिले 26 लाख, स्वता काढले 13 लाख
पोलीस तपासात समजले की प्रभावतीचे एका तरुणसोबत अनैतिक संबंध होते, ज्याच्या खात्यात तिने 26 लाख रुपये ट्रान्सफरसुद्धा केले होते, तर उर्वरित 13 लाख रुपये चेकद्वारे काढले होते. सध्या खात्यात केवळ 11 रुपये आहेत. पोलीस प्रभावती आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
Pune Crime | पुण्यात 23 वर्षीय तरुणीकडे बघत 63 वर्षीय नराधमाचं भरदिवसा हस्तमैथून, प्रचंड खळबळ