Crime News | कल्याण : तरुण जोडप्याचा अल्पवयीन बहीण-भावावर बलात्कार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या (Crime News) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत कल्याण पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (Young woman raped minor boy) केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे (rape on minor sister) अत्याचार करण्यास भाग पाडलं आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Crime News) हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

या घटनेत एका 23 वर्षीय तरुणीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक (Crime News) अत्याचार केले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. मागच्या काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचं जबरदस्तीनं लैंगिक शोषण करत होती. या घटनेची कुठे वाच्यता न करण्यासाठी हि तरुणी त्यांना धमकावत होती. यामुळे घाबरून पीडित मुलानं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडलं. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सातत्यानं लैंगिक अत्याचार केले आहेत.

 

 

अखेर आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ-बहिणीनं
मोठ्या धाडसानं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली.
यानंतर कुटुंबीयांनी कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली.
अल्पवयीन भाऊ-बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांनासुद्धा धक्का बसला.
पोलिसांनी आरोपी तरुण-तरुणी विरोधात पोस्को कायद्या (Posco Act) अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
कोळशेवाडी पोलीस (Kolshewadi Police) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Crime News | young couple raped minor brother and sister in kalyan thane district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा