‘क्राईम पेट्रोल’ फेम प्रेक्षा मेहताच्या आत्महत्येचं कारण समजलं, समोर आली ‘सुसाईड नोट’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं इंदोरमधील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनं प्रेक्षाच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. अद्याप तिच्या आत्महत्येमागचे कारणही समजू शकलेले नव्हते. प्रेक्षाच्या शेवटच्या व्हॉट्स अ‍ॅप स्टेसस आणि सोशल मीडियावर एक निराशाजनक पोस्ट केली होती. यानंतर आता तिची सुसाईड नोट समोर आली आहे. प्रेक्षानं हे पाऊल का उचललं याचा उलगडा आता झाला आहे.

नगर पोलीस ठाण्याचे इंस्पेक्टर राजीव भदौरिया यांनी एका प्रेक्षाच्या सुसाईड नोटविषयी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, “माझ्या तुटलेल्या स्वप्नांनी माझा विश्वास संपला आहे. मी माझ्या मेलेल्या स्वप्नांना घेऊन नाही जगू शकत. या निगेटीव्हिटीसोबत राहणं खूप अवघड आहे. गेल्या वर्षभरापासून मी खूप प्रयत्न केला. आता मी थकले आहे.” पोलिसांनी अशी माहिती दिली की, काम न मिळाल्यानं प्रेक्षा डिप्रेशनमध्ये होती. तिच्या नोटवरूनच लक्षात येत आहे की, ती किती त्रासात होती. तिनं तिच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरलेलं नाही.

प्रेक्षा इंदोरमधील बजरंग नगरमधील तिच्या घरात रहात होती. सोमवारी(दि 25 मे 2020) रात्री तिनं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती असं तिच्या घरचे सांगतात. प्रेक्षाला जेव्हा तिचे बाबा सकाळी उठवायला गेले तेव्हा त्यांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी लगेच तिला हॉस्पिटलला नेलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.