‘अश्लील’ कृत्य करत ‘छम छम’ सुरू असताना पोलिसांची बारवर ‘रेड’, 6 जण गोत्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शरीरविक्रीच्या रॅकेट प्रकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून उपनगरमध्ये पोलिसांनी धाडसत्र सुरु करून या प्रकणाचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वेकडील मनसा बारवर रविवारी पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली. अंधेरी पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडेत पोलिसांना अश्लिल नृत्य करताना 6 मुली आढळून आल्या. याप्रकरणी मॅनेजर, कॅशियर, 4 वेटर आणि 6 ग्राहकांना अटक केली आहे.

अंधेरी पोलिसांनी अंधेरी येथील मानसा बारवर छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये अश्लील नृत्य केले जात होते. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात केली आणि चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी अश्लील नृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारमध्ये महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या बारवर डान्स टाकण्यात आला. पोलीस आयुक्त अंकित गोयल यांनी सांगितले की, बारचा मालक, व्यवस्थापक, दोन वेटर आणि दोन ग्राहकांना अटक केली आहे. तर चार महिलांची सुटका करण्यात आली.