कुत्र्याच्या मृत्युप्रकरणी नसबंदी केंद्राच्या सुपरवायझरवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या व्हर्च्युअल जगात लोकांशी लोकांचा संपर्क कमी झाला असल्याने प्राणी पाळण्याचे फॅड वाढत चालले आहे. त्यात कुत्रे आणि मांजरे यांची आवड अधिक आहे. या कुत्र्यांचे संगोपनावर अनेक जण एका कुटुंबावर होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक खर्च करताना दिसतात. अशा कुत्र्याला नसबंदीसाठी महापालिकेच्या केंद्रात नेले असताना कुत्रीचा जाळीमध्ये मृत्यु झाला. आपल्या आवडत्या कुत्रीचा मृत्यु झाल्याने एका नागरिकांनी थेट पोलिसांकडे फिर्याद दिली. भोसरी पोलिसांनी मनपा कुत्र्याचे नसबंदी केंद्राच्या सुपरवायझरवर थेट गुन्हाच दाखल केला आहे.

अनुकुल कंपनीसमोरील एस पी सी ए संस्थेचे सुपरवायझर बापु पाटील यांच्यावर महा़राष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान पालिकेच्या नसबंदी केंद्रात घडला.

याप्रकरणी अ‍ॅन्सन अ‍ॅन्यनी पालकर (वय ३३, रा. म्हाळुंगे नांदे रोड) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी आपली कुत्री नसबंदी करण्यासाठी एस पी सी ए संस्थेत आणली होती. तेथील सुपरवायझर व इतरांनी कुत्रीची व्यवस्थित देखभाल न करता तिच्यावर देखरेख न ठेवता निष्काळजीपणा केल्यामुळे जाळीमध्ये अडकून तिचा मृत्यु झाला. त्यामुळे पालकर यांनी फिर्याद दिली आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या