विवाहितेचा छळ, पतीसह सहाजणांवर गुन्हा 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तू मनोरूग्ण आहेस’, वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासऱ्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पती कुणाल पुरूषोत्तम सावरकर (36, रा. उत्सव होम, बालाजी ट्रेडर्सच्या बाजुला, बावधन), त्याचा चुलतभाऊ सुमन सावरकर (45 ), आत्तेभाऊ पिंटू सावरकर (38), तसेच स्वप्निल भलमे (24), माया सावरकर (62) आणि दिपाली सुमन सावरकर (37) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेचा 27 एप्रिल 2015 मध्ये विवाह झाला. त्यानंतर आरोपींनी तिच्याकडे वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे ‘तू मनोरूग्ण आहेस’, असे म्हणत तिचा तब्बल साडेतीन वर्षाहून अधिक काळ छळ केला. त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक आणि अर्थिक छळ केला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.