अभिनेता शहीर शेखनं गर्लफ्रेंड रुचिका कपूरसोबत केलं कोर्ट मॅरेज ! व्हायरल झाले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्टर शहीर शेख (Shaheer Sheikh) लाँग टाईम रिलेशननंतर गर्लफ्रेंड रुचिका कपूर (Ruchikaa Kapoor) सोबत लग्न केलं आहे. कोरोना (Corona virus) महामारी पाहता दोघांनी आता मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केलं आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, दोघंही आता जूनमध्ये पुन्हा पारंपरिक अंदाजात लग्न करणार आहेत. अलीकडेच दोघांनी साखरपुडा केला होता.

व्हायरल झाले लग्नाचे फोटो
लग्नानंतर शहीर शेख आपली पत्नी रुचिकाला घेऊन जम्मूसाठी रवाना झाला. शहीर जम्मूचा रहिवाशी आहे. लग्नानंतर शहीर म्हणाला की, जिच्या सोबत त्याला आयुष्य काढायचं होतं अशी त्याची खरी जीवनसाथी त्याला अखेर मिळाली आहे. शहीर आणि रुचिका यांच्या कोर्ट मॅरेजचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले. अनेकांनी यावर कमेंट करत दोघांच्या नव्या आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

अलीकडेच शहीरनं त्याच्या इंस्टावरून रुचिका सोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात दोघंही स्माईल करत होते. रुचिकाची सुंदर स्माईल साऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसली होती. हाही फोटो सोशलवर खूपच व्हायरल झाला होता. अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचं आणि स्माईलचं कौतुक केलं होतं.