देवीचा मुखवटा चोरणारा सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कासेवाडी येथील भवानी पेठेतील बंद घरातून देवीचा मुखवटा, दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंत्रा बार समोरील सार्वजनीक रोडवर करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जुबेरअहमद निसाबउल्ला खान (वय-२८ रा. चिखली कुदळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने काशेवाडी येथील बंद घराचे कुलुप तोडून घरातील देवीचा मुखवटा, सोन्याचे मंगळसुत्र, देवाचे टाक असा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी मंत्रा बार समोरील सार्वजनीक रोडवर उभा असल्याची माहिती खडक तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल महावीर दावणे आणि आशिष चव्हाण यांना समजली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे खडक तपासी पथकाने सापळा रचून आरोपी खानला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेले सोन्याचे दोन पदरी मंगळसुत्र, देवीचा चांदीचा मुखवटा, पाच चौकोनी आकाराचे चांदीचे टाक, लहान मुलांच्या पायातील चांदीच्या पट्ट्या, चांदीचे वाळे असा एकूण ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like