महामार्गावरील धाब्यावर सुरु असणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्यात सर्रास सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या धाब्याचे नाव सेल्फी ढाबा असून येथे परराज्यातील मुली आणून सेक्स रॅकेट चालवले जात होते. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या गुन्हे पथकाने आणि वालीव पोलीसांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली असून मंगळवारी रात्री या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर हा सेल्फी ढाबा असून. या ढाब्याच्या फलकावरच चक्क खुलेआम तेथील रूमचे दर लिहिलेले आहेत. ६०० रुपयात येथे तासभर रूम दिली जाते त्याचबरोबर अनैतिक संबंध असणाऱ्या जोडप्यांना देखील या ठिकाणी सर्रास रूम दिल्या जात होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील आंबट शौकिनांसाठी तर चक्क १८ ते २५ वयोगटातील मुली त्याचबरोबर हायप्रोफाईल महिला देखील पुरविल्या जात होत्या. त्यांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रीकरवून घेतली जात होती असे या महिलांचे म्हणणे आहे.

पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वालीव पोलीस यांनी संयुक्तपने याठिकाणी छापा मारला आणि तेथील पीडित मुलींची सुटका केली. या कारवाईत हॉटेल मॅनेजर, एक दलाल यांच्यासह चार मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून. ताब्यात घेण्यात आलेल्या चार मुलींपैकी एक बांगलादेशी, एक कलकत्ता आणि दोन इतर राज्यातील आहेत. या सर्वांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like