पुण्यात तडीपार गुंडाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले असतानाही परिसरात फिरत असणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने अटक केली. सचिन पांडुरंग सोंडकर उर्फ घाऱ्या अण्णा (वय 38, राहणार. बी/62, अप्पर इंदिरा नगर,बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरातील फरार गुन्हेगाराचां गुन्हे शोध घेणे सुरु होते. गुन्हे शाखा 2 चे सहाय्यक पोलीस फौजदार शेखर कोळी हे सुखसागर नगर कात्रज येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुपारी 2.30 सुमारास गोपनीय बातमीदारांमार्फत बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला आरोपी सचिन अप्पर इंदिरानगर येथील 16 एकर मोकळ्या मैदानामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, एसीपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस नाईक भिलारे, पोलीस नाईक चेतन गोरे, पोलीस शिपाई फरांदे यांनी केली.

सदर घटनेचा पुढील तपास, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचने प्रमाणे पोलीस हवालदार विनायक जांभळे, पोलीस शिपाई अमोल गुजर, पोलीस शिपाई अमोल शितोळे करीत आहेत.