सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारास हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. बंडोपंत ऊर्फ बंड्या आप्पासाहेब दडगे (वय 42, रा. गावभाग) असे त्याचे नाव आहे. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक शहरात गस्त घालत होते. मारुती चॉक परिसरात हद्दपार गुन्हेगार बंड्या दडगे आल्याची माहिती निरीक्षक पिंगळे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने त्याला मारुती चौक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद माळी, अमित परीट, युवराज पाटील यांनी ही कारवाई केली.

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर