अनैतिक संबंधातून पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  अनैतिक संबंधातून पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस हवालदारासह त्याच्या प्रेयसीवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय सर्जेराव शेलार (वय ४५ रा. कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २००० सालापासून सुरु होता. विजय शेलार याचे वाकडमधील म्हतोबानगर झोपडपट्टीतील एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. याबाबत त्यांनी पतीला विचारले असता विजय याने त्यांना वारंवार शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पती आपले ऐकत नसल्याने त्यांनी या महिलेच्या घरी जाऊन तिला आमचा संसार मोडू नको, अशी विनंती केली. मात्र, तिने शिवीगाळ करुन मारण्यासाठी अंगावर धावून जाऊन तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी दिली.