कंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतच्या विरूद्ध कर्नाटकच्या तुमकुरच्या एका न्यायालयत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. कंगना राणावतच्या विरूद्ध शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा आरोप करत केस दाखल केली आहे. दाखल केसमध्ये म्हटले आहे की, कंगना राणावतने कृषी बिलाचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचा ट्विट करून अपमान केला.

कृषी बिलावरून कंगना राणावतने केलेल्या एका ट्विटबाबत म्हटले जात होते की, तिन शेतकर्‍यांचा अपमान केला आहे. या ट्विटवरून देशभरात अनेक ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी निदर्शने सुद्धा केली. मात्र, नंतर स्पष्टीकरण देत कंगनाने म्हटले की, तिने शेतकर्‍यांचा अपमान केलेला नाही.

केंद्र सरकारच्या कृषी बिलाच्या विरूद्ध शेतकरी संघटना देशभरात आंदोलनं करत आहेत. या कृषी विधेयकांच्या विरूद्ध 25 सप्टेंबरला देशातील शेतकरी आणि राजकीय संघटनांनी भारत बंद ठेवला होता. शेतकर्‍यांच्या बंद देशभरात परिणाम दिसून आला.

शेतकरी या बिलाचा विरोध यासाठी करत आहेत, कारण त्यांना वाटते की, नव्या विधेयकांमध्ये बाजार व्यवस्था नष्ट होईल आणि किमान अधारभूत किंमत (एमएसपी) प्रणाली नष्ट होईल. यामुळे व्यापारी शेतकर्‍यांचे उत्पादन कवडीमोलाने विकत घेतील.