पोलिसांच्या हातावर ‘तुरी’ देऊन आरोपीचे ‘पलायन’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – कारागृहातून औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असताना गर्दीचा फायदा घेत आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. मुबारक नबाब तडवी (वय २५, रा. वड्री परसाळा, ता. यावल) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात शनिवारी हा प्रकार घडला. तडवी याला दोन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी मिळाल्याने कारागृहात दाखल करण्यात आले होते.

पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक शेख मुसा, शेख ईसा व सहायक फौजदार गफ्फार अदिल शेख यांना शनिवारी गार्ड ड्युटी होती. त्यांनी कारागृहातील मुबारक तडवी व वैभव गोपाळ गवळी यांना कारागृहातून ताब्यात घेतले. शासकीय वाहनाने दोघांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. पोलीस नाईक शेख याने मुबारक तडवी याला पोटाला ड्रेसिंग करण्यासाठी ११० क्रमांकाच्या खोलीत नेले. तर सहायक फौजदार गफ्फार शेख यांनी वैभव गवळी याला ईसीजी तपासणीसाठी नेले. ड्रेसिंगनंतर शेख हे मुबारक तडवी याला घेऊन जात असताना त्याने हातातील बेडी काढून पळ काढला. शेख यांनी आरडाओरडा केल. परंतु, तडवी कोणाच्या हाताला लागला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/