Criminal Flees From Sassoon hospital | शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणार्‍या आरोपीचे ससून हॉस्पीटलमधून पलायन, पुणे पोलिस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Criminal Flees From Sassoon hospital | सायबर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पुणे पोलिसांच्या (Pune Cyber Police) हातावर तुरी देऊन ससून हॉस्पिटलमधून पलायन केले आहे. मार्शल लुईस लीलाकर Marshall Lewis Leelakar (रा. आकुर्डी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येनंतर (Sharad Mohol Murder Case) त्याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मार्शल लुईस लीलाकर याने दिल्याची माहिती समोर आली आहे.

मार्शल लुईस लीलाकर याला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती. अश्लील शिवीगाळ, कमेंट, प्रकरणी त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात आपीसी 500, 506, 509 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अन्वये गुन्हा दाखल होता. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार झालेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Aundh Crime | पुण्यातील औंध परिसरात थरार ! गोळीबार करून खूनाचा प्रयत्न केल्यानंतर गोळीबार करणार्‍याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या (Video)