कुपवाडमधील रेकाॅर्डवरील गुन्हेगार सैफअली सरदार मगदूम याचा खून

कुपवाड (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगाराला  चार जणांनी काठ्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.  पूर्वीच्या वादातून रेकाॅर्डवरील गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम(वय-२२,रा दत्तनगर,बामणोली) याचा खून झाला.

या खून प्रकरणातील तीन संशयिताना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालू केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. त्या फरारी आरोपीच्या शोधासाठी पोलिसाचे एक पथक रवाना झाले आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. सांगली भागात गुन्हेगारी वाढली असून सुरक्षेचा प्रश्न गंबीर झाला आहे. मागील काही काळात सांगली शहरात एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना हि समोर आली होती. आता काठ्यांनी मारून एका व्यक्तीची हत्या झाल्याने सांगली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अखिलेश सोबत या चार लोकांची काय दुष्मनी होती कि ज्यामुळे हे चौघे त्याचा जीव घेण्यावर उठले होते याबद्दल कसलीच माहिती मिळाली नसून कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

१२ डिसेंबरच्या रात्री कुपवाड येथून अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम याला संशयित आरोपी एका अज्ञात स्थळी घेऊन गेले तेथे त्याला या चौघांनी काठ्यांच्या  सहाय्याने बेदम मारहाण केली. अर्धमेला झालेल्या अखिलेशला आरोपींनी झाडीत टाकून दिले आणि तेथून ते पळून गेले त्यानंतर मध्यरात्री या घटनेची माहिती मिळताच जखमी अखिलेशच्या घरच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घडलेल्या  प्रकाराबद्दल पोलिसात फिर्याद दिली. जखमी अखिलेशला त्याच्या घरच्या लोकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत अखिलेशचा  भाऊ साजिद सरदार मगदूम याने चार आरोपींच्या विरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या हत्या प्रकरणाचा कसून तपास करत असून त्यांनी तीन संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून पोलीस कसून तपास करत आहेत.