प्रकल्प अर्धवट ठेवून फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकाम प्रकल्प अर्धवट ठेवून फ्लॅटचा ताबा वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ललित शिवाजीभाई ठक्कर (५२) व मनिष ललित ठक्कर या दोघांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सागर सुभाष अनवेकर (धनकवडी), संतोष रामचंद्र धुमाळ, विवेक सुरेश पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी ठक्कर यांनी येवलेवाडी येथे सुरु असलेल्या वृंदावन रेसिडन्सी या प्रकल्पामध्ये २०१२ साली एक फ्लॅट बुक केला. त्यांनी फ्लॅटसाठी पुर्ण रक्कमही दिली. त्यासाठी त्यांनी खरेदीखत करून दिले. फ्लॅटचा ताबा डिसेंबर २०१४ पर्यंत देण्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी हा प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट ठेवले. तसेच फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे ठक्कर यांनी यासंदर्भात लष्कर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

You might also like