दर्गाह तवक्लशाहा वली ईनामी जमिनीचा झालेला बेकायदा खरेदी व्यवहार प्रकरणी फौजदारी कारवाई सुरू : वक्फ मंडळ औरंगाबाद

नायगांव : पोलीसनामा ऑनलाइन (अविनाश वि.अनेराये) –  नायगांव बा. येथील दर्गाह तवक्लशाहा वली ईनामी जमीन गट क्र. 448, 449, 450 मध्ये बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार होऊन गैर अर्जदारानी स्वत:ची नावे 7/12 अधिकार अभिलेखात नोंद करून घेतली या प्रकरणी नायगांव मुतवली यांच्या वंशजाच्या तक्रारीवरून वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी सदर ईनामी जमिनी प्रकरणी झालेला खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी तात्काळ रद्द करण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सहसर्व संबंधीताना कळवून असे व्यवहार करणाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात येत असल्याचे कळविले आहे.

सविस्तर वृत्त असे की,

नायगांव बा. येथील दर्गाह तवक्लशहा वली इनामी जमीन गट क्र. 448, 449, 450 व सर्वे नं. 145 व 146 अशी नोंद असून त्यामध्ये 0.39 आर व 03 एकर 1 गुंटे अशी नोंद असल्याचे दिसते सदर जमिनीची देखभाल करणेसाठी वक्फ मंडळाकडून नायगांव येथील मुतवली शेख जलाल रहेमान साब यांच्या वंशजाकडून देखभाल होत होती. कालंतराने मुतवलीनी सदर जमीन ही एका संस्थेस लिजवर दिल्याचे काही नोंदी आहेत सदर संस्थेची लिज संपल्यामुळे मुतवलीच्या वंशजाकडून जमीन वापस घेण्याचा प्रयत्न झाला, पण काही राजकीय मंडळी सदर जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री चा व्यवहार सुरू केला, त्या संदर्भी येथील मुतवलीचे वंशज शेख सय्यदअली बाबुसाब व त्यांचे सहकारी संबंधीत वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याकडे रितसर तक्रार केली त्यावरून त्यांच्या अर्जाची दखल घेऊन सदरील वक्फ मंडळानी निकाल देऊन बेकायदेशीर इनामी जमिनीवर बेकायदा नोंदी घेण्यात आल्या होत्या त्या हटवून दर्गाह तवक्लशाहा वली इनामी जमिनीची नोंद घेण्यात आली होती. तरी पण येथील काही राजकीय मंडळीना सदर जमीन सोडू नये वाटेल ते करू पण जमीन हडप करू असा जनु काय विडच उचलला होता की काय ? परंतु 2008 च्या नंतर त्याच सर्वे नं. मध्ये व त्याच गटात पुन्हा नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांचे नाव त्या 7/12 वर झळकले. तेंव्हा मुतवलीचे वंशजा करवी मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्या दालनात अॅड. शंभुराजे व्ही देशमुख यांच्या मार्फत दि. 20 जूलै 2020 रोजी याचिका दाखल करण्यात आली, त्या याचीकेच्या सुनावनी संदर्भात व नायगांव बा. येथील काही गांवकऱ्यांच्या म्हणन्यानुसार दर्गाह तवक्लशाहावली नायगांव बा. ता. नायगांव जि. नांदेड ची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 27.02.1975 भाग-क च्या अनुक्रमांक 35 वर असून सर्वे नं. 145 एकूण क्षेत्र 0.39 गुंटे जमिनीची नोंद आहे, तसेच खासरा पत्रक नुसार सर्वे नं. 146 सध्याचे गट क्रमांक 450 दर्गाहची मिळकत असून त्यांचे एकूण क्षेत्र 03 एकर 01 गुंटा आहे. सदरील वक्फ संस्थेची नोंद वक्फ अधिनियम 1995 चे कलम 36 नुसार क्रमांक MSBW/NDD/194/2015 अन्वये वक्फ मंडळात तशी नोंद आहे. त्यानुसार वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी दि.13.04.2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करून गट क्र. 448, 449, 450 मधील 7/12 वर घेण्यात आलेल्या अनाधिकृत नोंदी कमी करण्यात याव्यात असे आसतानाही आज तागायत पर्यंत संबंधीत नोंदी कमी झाल्या नाहीत उलट त्यावर संजय माधवराव बेळगे असे मालकी हक्क दाखवणारे फलक दिसून लागले आहेत. सदर ईनामी जमिनीवर मालकी हक्क दाखवणारे दर्गाह तवक्लशाहा वली, नायगांव ता. नायगांव वक्फची मिळकत अफरातफर करण्याचे हेतुने मिळकतीच्या मालकीची कागदपत्रात फेरफार करून वक्फ मिळकतीच्या अधिकार अभिलेखात वाईट हेतुने फेरफार करून घेतला आहे. त्या सर्वा विरूध्द वक्फमंडळ कायदेशीर सल्या प्रमाणे वक्फ अधिनियम 1995 चे कलम 61, 52 व 52अ नुसार भारतीय दंड विधानातील इतर कलामातंर्गत फौजदारी कार्यवाही सुरू करीत आसल्याचे नमुद करून नांदेड जिल्हाधिकारी यांच्या सह सह.जिल्हा निबंधक, नांदेड तहसिलदार नायगांव, दुय्यम निबंधक श्रेणी-1 नायगांव, नगर पंचायत नायगांव, जिल्हा वक्फ अधिकारी, नांदेड यांना सदर ईनामी जमिनीत घेतलेल्या बेकायदेशीर नोंद तात्काळ रद्द करण्यात येऊन त्या ठिकाणी वक्फ संस्थेचे नाव धारक सदरी नोंदविने व वक्फ मिळकतीमध्ये मुतवली अगर वक्फ मंडळाने परवानगी दिलेली व्यक्तीच्या शिवाय कोणीही त्या इनामी जमिनीवर प्रवेश करू नये असेही आज दि. 15.09.2020 रोजी दिलेल्या वक्फ मंडळाच्या आदेशात नमुद केले आहे.