कोंढव्यातील कुविख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिस्तूलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिक तसेच छोट्या व्यापार्‍यांकडून खंडणी उकळणार्‍या कुविख्यात गुन्हेगाराला शहरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी हे आदेश दिले आहेत.

आतिक इकबाल शेख (लवय 34, रा. सय्यदनगर) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आतिक हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर कोंढवा, हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्यात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आतिक हा कायम कंबरेला पिस्तूल लावून फिरत असे. तसेच, बांधकाम व्यावसायिक आणि छोट्या व्यापारी व दुकानदारांना पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असे. तसेच, बळजबरीने वाद घालून परिसरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच्या या प्रकरामुळे कोंढवा पोलीसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. त्यानुसार, त्याला एक वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/