एमपीडीएअंतर्गत सराईत गुंड स्थानबद्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गुंडां विरोधात प्रतिबंधधात्मक कारवाई तीव्र केली असून कोंढव्यातील एका सराईत गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक वर्षासाठी कारागृहा स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिले.

आकाश लाला म्हस्के (वय २१,रा. कृष्णानगर, महम्मदवाडी, कोंढवा) असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव आहे.

म्हस्के हा कोंढवा परिसरातील सराईत गुंड आहे. त्याची महम्मदवाडी परिसरात दहशत आहे. त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत त्याची रवानगी कारागृहात केली आहे..