पारनेरमध्ये चोरट्यांकडून वृद्ध दांपत्यास मारहाण

पारनेर (अहमदनगर) :  पोलीसनामा ऑनलाईन

पारनेर तालुक्यातील लोणी मावळ येथे चोरट्यांनी वृद्ध दांपत्यास दगडाने बेदम मारहाण करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6432ed41-c65c-11e8-878e-572615ca25f1′]

पर्वती लक्ष्मण राऊत आणि लक्ष्मण राऊत अशी जखमी झालेल्या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. पर्वती राऊत यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

[amazon_link asins=’B076ZFTCJZ,B076ZLS8NZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7aad5237-c65c-11e8-ae96-7100f0c5eb6a’]

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील लोणी मावळ पासून एक किलोमीटवर हे वृद्ध दांपत्य राहते. हे दांपत्य घराच्या समोरील भागात झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी वृद्ध दांपत्याच्या दिशेने दगड फेकण्यास सुरुवात केली.
पुणे/पिंपरी : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्याअचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दांपत्याने चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत लक्ष्मण राऊत यांच्या अवघड जागेवर मार लागला आहे तर पर्वती राऊत यांच्या डोक्यात दगड लागला आहे. या घटनेत जखमी झाल्याने त्यांच्यावर पारनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या वृद्ध दांपत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत आहे. सध्या या परिसरात भितीचे वातावरण असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करित आहेत.

जाहिरात.