पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी बेड्यासह पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे येथील खुनातील आरोपीला पकडण्यासाठी हडपसर पोलीस दुसऱ्या एका आरोपीला सोबत घेऊन येरोळ येथे आले असतांना पकडलेल्या आरोपीने पोलिसांच्याच हातावर तुरी देत पलायन केले. यामुळे हडपसर पोलीस अडचणीत आले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cd224d0-c95d-11e8-82d4-0786fab2710a’]

भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन तिन जणांनी रिक्षा चालकाला मारहाण करुन खून केला. याप्रकरणी हेळंब ता. देवणी येथील विकास रघुनाथ सुर्यवंशी (वय २७) याला अटक केली होती. विकास सुर्य़वंशी व येरोळ येथील राम गंगाधर लोंढे या दोघांनी भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन रिक्षा चालकाचा खून केला होता.

या गुन्ह्यात आरोपी विकास सुर्यवंशी याला अटक करण्यात हडपसर पोलिसांना यश आले होते पण दुसरा आरोपी हा शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे असल्याने पोलीस आरोपी सुर्यवंशी याला सोबत घेऊन येरोळ येथे शिरुर अनंतपाळ पोलिसांना कल्पना न देता पुणे पोलीसांची टिम येरोळ येथे पोहचली. यावेळी लघुशंकेचे निमित्त करून आरोपीने पोलीसाला हिसका देऊन बेडीसह पळून जाण्यात यशस्वी झाला. या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर खून, मारामारी, चोऱ्या करणे असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1347e395-c95d-11e8-a09f-e7c5ff29a32e’]

घटनेची हकीकत…
भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन तिन जणांनी रिक्षा चालकाला मारहाण करुन खून केला. तसेच रिक्षा चालकाची रिक्षा घेऊन पळून गेलेल्या आरोपींपैकी एका आरोपीला लातूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे सोलापूर रोडवरील इराणी नर्सरी सोमोर उघडकीस आली होती. अकबर दौलतखान पठाण (वय-३५) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. विकास रघुनाथ सुर्यवंशी (वय – २७ रा. मुपो. हेळंब ता. देवणी, लातूर) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचे इतर दोन साथिदार फरार आहेत. याप्रकरणी संतोष सत्यवान देवकर (वय-४२ रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’171e9f83-c966-11e8-8d45-05d34e0ffe67′]

पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी आलेल्या आरोपीने इतर दोन साथिदारांच्या मदतीने रिक्षा चालक पठाण याचा खून केला. खून केल्यानंतर त्यांची रिक्षा घेऊन आरोपी फरार झाले. या गुन्ह्याचा तपास करित असताना फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भांदुरगे यांनी मिळालेल्या माहितीनुसार तांत्रीक विश्लेशन करुन आरोपीचा शोध घेऊन आरोपीला लातूर येथून अटक केली होती. आरोपी सुर्य़वंशी हा लातूर येथून पुण्यातील गणपती पाहण्यासाठी आला होता.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19cd337e-c95d-11e8-96d9-afdccf63ade4′]

आरोपी सुर्यवंशी आणि त्याच्या इतर दोन साथिदार दारू पिऊन मयत पठाण यांच्या रिक्षातून गणपती पाहण्यासाठी जात होते. परंतु रिक्षा चालक पठाण यांना घरी जायचे असल्याने त्यांनी भाड्याच्या पैशांची मागणी करुन पुढे जाण्यास मनाई केली. याचा राग आल्याने आरोपींनी पठाण यांना शेवाळवाडी रोड लगत रिक्षा थांबवून मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी रिक्षा घेऊन शिवाजीनगर परिसरात आले. आरोपींनी रिक्षा शिवाजीनगर परिसरात सोडून देऊन सुर्यवंशी लातूला निघून गेला. पोलिसांनी पुरावा नसताना गुन्हा उघडकीस आणला होता.