झाडांमध्ये लपून बसलेल्या चोरट्याला ‘वायू उत्सर्जन’ पडले महागात

पोलिसनामा ऑनलाईन – चोरांचा पाठलाग करताना पोलिसांना अनेक अनुभव येत असतात. असाच काहीचा प्रकार स्कॉटलण्डमध्ये घडला आहे. वेस्ट बाससेटलॉ पोलीस दोन आरोपांचा शोध घेत होते. मात्रा त्यांचा पाठलाग करताना दोघेही झाडामध्ये लपून बसले होते. पण त्याचवेळी एका चोराने वायू उत्सर्जन केल्याने (पादल्याने) हे दोघेही चोर पकडले गेले. यासंदर्भात पोलिसांनीच सोशल नेटवर्किंग पोस्टमधून माहिती दिली आहे.

शहरात चोरी केल्यानंतर दोघा चोरट्यांनी पलायन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पोलीस त्याना पकडण्यासाठी गेले असता दोघांनी नागरी वस्तीमधून पळ काढत रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या झाडांमध्ये लपले. पोलीस पाठलाग करत तेथे पोहचले मात्र आरोपी कुठे फरार झाले यांचा त्यांना काही अंदाज बांधता येत नव्हता. हातून दोघे चोर सुटले असे पोलिसांना वाटत असतानाच त्यांना झाडांच्या मागून मोठ्याने पादण्याचा आवाज आला. त्यामुळे पोलिसांनी झाडाच्या दिशेने धाव घेतली असता दोघे चोरटे आढळून आले. चोर आमच्या हातून निसटल्याचे आम्हाला वाटले. मात्रा, अचानक झाडांमागून आवाज आला आणि आम्ही आवाजाच्या दिशेने झाडांमध्ये जाउन त्यांना ताब्यात घेतल्याचे अधिकार्‍याने सांगितले. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन पोलिसांचे अभिंदन केले आहे. पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या यशस्वी तपास मोहिमेचे कौतुक होत आहे.