शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी काँग्रेस सकारात्मक , ‘या’ अटी सोनिया गांधींना मान्य?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेसोबत जाण्यास महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते उत्सुक असले तरी, अन्य राज्यांतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याला विरोध आहे. मात्र आता सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवस चर्चा केल्यानंतर तीन पानी दस्तावेज तयार केला आहे. त्यातील काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काग्रेसने खालील मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.

तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समन्वय समिती असावी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चिच केला पाहिजे. सत्तावाटपाचा एक निश्चित असा फॉर्म्युला तयार व्हावा.
आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त सरकार बनवत आहोत असे तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे घोषित करावे. राज्यातील सत्तेबरोबरच महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित केला जावा.

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नको आणि काँग्रेस पक्षाला विधानसभा अध्यक्षपदासह 4 आमदारांमागे एक मंत्रिपद द्यावे. राज्यपालांना द्यावी लागणारी सर्व पत्र बुधवार किंवा गुरुवारपर्यंत गोळा व्हावीत.

सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. काँग्रेसच्या या नेत्यांनी हा तयार झालेला दस्तावेज सर्वप्रथम सोनिया गांधी यांना दाखवला. त्यानंतरच सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like