‘लॉकडाऊन’मुळं अभिनेत्री कंगना रणौतच्या सिनेमावर ‘संकंट’ ! झालं एवढ्या कोटींचं ‘नुकसान’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सर्वच शुटींग बंद आहेत. काही सिनेमांच्या रिलीज डेटही टाळण्यात आल्या आहेत. अशात अनेक सिनेमांचं कोटींचं नुकसान होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे अनेक सिनेमांचे सेट तयार आहेत ज्यांची खराब होण्याची दाट शक्यता आहे. अशीच काहीशी बातमी अभिनेत्री कंगना रणौतच्या थलायवी सिनेमाच्या मेकर्सबद्दल येताना दिसत आहे. त्यांनाही कोटींचं नुकसान सहन करावं लागत आहे.

कंगनाचा आगामी सिनेमा थलायवीची गेल्या अनेक दिवसांपासून शुटींग सुरू होती. यातील अनेक महत्त्वाचे सीन शुट होणं बाकी होतं. अशात आता मध्येच लॉकडाऊन लागू झाला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळं सिनेमाचा आलिशान सेट तसाच आहे. अशीही माहिती आहे की, लॉकडाऊनमुळं सिनेमाचं 5 कोटींचं नुकसान झालं आहे.

रिपोर्टनुसार, थलायवी सिनेमाच्या मेकर्सना स्टुडिओ रेंट आणि मेंटेनंसची किमंत मोजावी लागत आहे. थलयावीच्या टीमनं हैद्राबाद स्टु़डिओत 45 दिवसांच्या शूटसाठी संसद भवनचा सेट बनवला होता. पंरतु सेट बनवल्यापासून एकही दिवस सिनेमाची शुटींग झाली नाही. यामुळं मेकर्सना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. जवळपास त्यांना 5 कोटींचा फटका बसला आहे. मेकर्स आता प्रार्थना करत आहेत की, सिनेमाची शुटींग पावसाच्या आधी पूर्ण व्हावी नाही तर त्यांना आणखी नुकसान सहन करावं लागू शकतं.