क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास, इंस्टाग्रामवर झाले 25 कोटी फॉलोअर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोर्तुगालचा चॅम्पियन फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो सातत्याने आपल्या किकची जादू मैदानावर दाखवतो आणि जबरदस्त गोल मारतो. परंतु सोशल मीडियाच्या मैदानात सुद्धा हा खेळाडू चॅम्पियन आहे. सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर क्रिस्टियानो रोनाल्डोने इतिहास रचला आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या इंस्टाग्रामवर 25 कोटी फॉलोअर्स झाले आहेत, जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तो जगातील पहिला वक्ती आहे ज्याचे इंस्टाग्रामवर 25 कोटी फॉलोअर्स आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो सोशल मीडियावर आपले वैयक्तिक आयुष्य, गर्लफ्रेंड, मुलांचे फोटो पोस्ट करत असतो. तो इंस्टाग्रामवर आपली बॉडीसुद्धा दाखवतो आणि याच करणामुळे त्याला केवळ फुटबॉल प्रेमीच नव्हे, तर प्रत्येक प्रकारचे लोक फॉलो करतात.

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत क्रिस्टियानो रोनाल्डोच्यानंतर पॉपस्टार एरियाना ग्रँडे आहे, तिचे 213 मिलियन फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोचे 2019 पर्यंत 20 कोटी फॉलोअर्स होत. परंतु 2020 संपताच त्याचे 5 कोटी फॉलोअर्स आणखी वाढले.