रोनाल्डोनं खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल चकित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार बुगाटी लावाओएवर खरेदी केली आहे. ज्या क्लबसाठी रोनाल्डो फुटबॉल खेळतो, त्यांनी नुकतीच ३६ वी मालिका ए चँपियनशिप जिंकली होती. यानंतर त्याने ही कार स्वतःसाठी गिफ्ट म्हणून खरेदी केली. गाडीची किंमत जाणून तुम्ही चकित व्हाल. त्याने ही कार खरेदी करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

रोनाल्डोने खरेदी केलेली कार बनवणार्‍या कंपनीने अशा १० च गाड्या बनवल्या आहेत. त्याने बुगाटी लावाओएवर खरेदी करण्यासाठी सुमारे ८.५ मिलियन युरो (सुमारे ७५ कोटी) खर्च केले आहेत.

३५ वर्षीय स्टार फुटबॉलर रोनाल्डोने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो आपल्या चाहत्यांसाठी अपलोड केला आणि त्यांना माहिती दिली. जगातील सर्वात महागड्या कारचा मालक असलेल्या रोनाल्डोच्या गॅरेजमध्ये आता जितक्या कार आहेत, त्यांची किंमत जर जोडली तर ती ३० मिलियन युरो म्हणेज सुमारे २६४ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.

बुगाटी लावाओएवर कार ३८० किमी प्रतितासाचा वेग पकडू शकते, २.४ सेकंद या कारची गती ६० किमी प्रतितास वेगापर्यंत पोहोचते. मात्र या कारसाठी रोनाल्डोला २०२१ पर्यंत थांबावे लागेल आणि पुढच्या वर्षी त्याला याची डिलिव्हरी मिळेल.

अलीकडे, बुगाटी आणि नाईकी यांनी मिळून क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी एक विशेष बूट सादर केला आहे. स्पोर्ट्सवेअर ब्रँडने ऑटोमोबाईल ब्रँडसह मिळून “नाइके मर्क्यूरियल सुपरफ्लरी CR7 Dieci” लाँच केली, जी सेंटोडायसी किंवा बुगाटी लावाओएवरने प्रेरित आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like