Coronavirus : ‘कोरोना’ची क्रिस्टियानो रोनाल्डोच्या सहकारी खेळाडूला ‘लागण’, टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस संसर्गाला महामारी घोषित केले आहे. संपूर्ण जगात यामुळे हाहाकार उडाला आहे. या भयंकर व्हायरसमुळे अनेक स्पोर्ट्स इव्हेंट रद्द आणि स्थगित करण्यात आले आहेत. दरम्यान, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचा सहकारी खेळाडू डिफेन्डर डॅनियल रुगानीला कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकरणाची माहिती देताना क्लबने सांगितले की, रुगानीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. परंतु, घाबरण्याचे कारण नाही. क्लबने त्या लोकांचा शोध सुरू केला आहे, ज्यांना-ज्यांना रूगानी भेटला होता.

रोनाल्डो आणि डॅनियल दोघे जुव्हेन्टसकडून खेळतात. रूगानीला खास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रोनाल्डो सध्या पोर्तुगालमध्ये आहे. या महामारीमुळे इटलीमध्ये 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 12 हजार लोकांना संसर्ग झाला आहे, ज्यामध्ये काही सीडी सीचे खेळाडू सुद्धा आहेत.

चीननंतर हा खतरनाक व्हायरस सर्वात जास्त इटलीमध्ये पसरला आहे. खेळाडूंना यापासून वाचवण्यासाठी सावधानता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. जगभरात बुधवारपर्यंत 1 लाख 24 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर 113 देशांत आणि क्षेत्रात 4500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली सरकारने या व्हायरसचा प्रकोप पाहता 3 एप्रिलपर्यंत सर्व खेळांच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. या शिवाय ज्या मॅच होतील त्या रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.