Cristiano Ronaldos Newborn Son Died | दुर्देवी ! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात बालकाचा मृत्यू, ट्विट करून दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – Cristiano Ronaldos Newborn Son Died | जगभर प्रसिद्ध असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डोवर (Cristiano Ronaldo) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात बाळाचा मृत्यु झाला आहे. याबाबत ट्विट करत रोनाल्डोने माहिती दिली आहे. गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodríguez) जुळ्या बाळांना जन्म दिला होता. मात्र यातील नवजात मुलाचा मृत्यु झाला आहे आणि मुलगी सुरक्षित राहिली आहे. (Cristiano Ronaldos Newborn Son Died)

 

आम्ही आमच्या नवजात बाळाला गमवलं असून आमच्या वेदना ह्या फक्त आई-वडीलच समजू शकतात. जॉर्जिनाला जुळी मुलं झाली होती मात्र त्यातील मुलाला आम्हाला गमवावं लागलं असून मुलगी सुखरूप आहे. आता ही मुलगीच आमच्यासाठी आधार, आनंद आणि आशा आहे. आमच्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर, सिस्टर्स यांनी खूप काळजी केली, प्रयत्न केले आणि आम्हाला धीर दिला, मात्र नवजात बाळ गेल्याने आम्हाला मोठा धक्का बसला असल्याचं रोनाल्डोने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Cristiano Ronaldos Newborn Son Died)

 

 

 

ऑक्टोबर महिन्यामध्ये रोनाल्डो आणि जॉर्जिना यांनी आपल्याला जुळं होणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यानंतर

हे दोघेही आनंदात होते. मात्र नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. त्यामुळे त्याच्या आनंदात मोठं विरझन पडलं आहे.

दुसरीकडे मुलगी सुरक्षित राहिल्याने त्यांना आनंद आहे. ऑक्टोबर महिन्यात रोनाल्डो आणि

जॉर्जिया यांनी गोड बातमी (Good News) सगळ्यांसोबत शेअर केली होती.

 

 

Advt.

दरम्यान, जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये (Best Footballer) रोनाल्डोची बरोबरी होते. त्याने आत्तापर्यंत

आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 गोल केले आहेत. तर 9 वेळा त्याने हॅट्रीक केली आहे. पोर्तुगालसाठी (Portugal) सर्वात जास्त गोल करणारा रोनाल्डो खेळाडू आहे.

 

 

Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! मानलेल्या मामानं दाखवलं ‘काम’, 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर

BSNL Best Recharge Plan | बीएसएनएलचा बेस्ट प्लॅन ! 797 रुपयांत SMS, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह अनेक सुविधा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या ‘मसुदा फी’मध्ये चार ते पंधरापट वाढ ! जाणून घ्या कोणा-कोणाला बसणार फटका