अहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – आजपर्यंत तंबाखुमुळे कॅन्सर होऊन आपले प्राण गमवावे लागल्याच्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत. कॅन्सरमुळे त्रासदायक अवस्थेत अनेकजण आपलं आयुष्य घालवताना आपण पाहिले आहे. मात्र तंबाखू सोबत असलेल्या चुन्याच्या पुडीमुळे कधी कोणाला आपल्या आयुष्यात त्रास सहन करावा लागल्याचे ऐकले नसेल. मात्र, चुन्यामुळे पुण्यातील आकाश ससाणेला आपला डोळा गमवावा लागला होता.

आकाश लहान असताना चुन्याची पुडी खेळता खेळता डोळ्यात चुना गेल्यामुळे त्याला एक डोळा गमवावा लागला होता. एका डोळ्याची दृष्टी गेल्याने त्याला दैनंदिन जीवनात अडचणीत येत होत्या. या डोळ्यावरील उपचारासाठी त्याने अनेक दवाखान्यांच्या फेऱ्या केल्या. मात्र त्याला सगळीकडे निराशाच पदरी पडली.

अनेक वर्षांनी त्याला नगरमध्ये आनंद ऋषीजी नेत्रालयात प्रकाश मिळाला. शिरुर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांनी ससाणे याच्यावर स्टेम सेल ट्रान्सप्लान्टेशन शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर आकाश काम करून लागला असून, लवकरच त्याला पूर्ण दृष्टी मिळेल, असे डॉक्टारांनी सांगितले.

तंबाखू सोबत येणारी चुन्याची पुडीही तुमचं आयुष्य खराब करू शकते, चुन्याची पुडी खेळता खेळता गेलेला डोळा आकाशला परत मिळवण्यासाठी अनेक वर्षे एकाच डोळ्यांनी पाहावे लागले अनेक कामांसाठी त्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. स्टेम सेल शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांनी नजर परत येते. अतिशय किचकट व अवघड अशी ही शस्त्रक्रिया करणारे निवडक डॉक्टर भारतात आहेत. त्यामुळे तंबाखू खाणाऱ्यांनी आतापासून सावधानतेने चुन्याची पुडी जपून ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –