श्रीलंकेत राजकीय पेच गंभीर, संसद बरखास्तीचा निर्णय कोर्टाने फेटाळला 

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी संसदेच्या बरखास्तीचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय तेथील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला असून निवडणुकांनाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेत गंभीर राजकीय पेच निर्माण झाला आहे. सिरीसेना यांनी २६ ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांना पदावरुन हटवून त्यांच्या जागी माजी राष्ट्रपती महिंदा राजेपक्षे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर सिरीसेना यांनी संसद बरखास्त करुन नव्याने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. सिरीसेना यांच्या या निर्णयाला कोर्टाने धुडकावले आहे.
श्रीलंकेच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश नलिन परेरा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने संसद बरखास्तीचा निर्णय मागे घेतला आहे. या सुनावणीदरम्यान, कोर्टात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, खंडपीठाने कमांडोंच्या कडक पहाऱ्यातून हा महत्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने संसद बरखास्तीचा आदेश धुडकावल्यानंतर रानिल विक्रमसिंगे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जनतेला पहिला विजय मिळाला आहे. यानंतर आता आणखी पुढे सरकत आणि आपल्या देशवासीयांना पुन्हा एकदा सार्वभौमत्व बहाल करायचे आहे.

गुजरात दंगल : मोदींच्या अडचणी वाढल्या, सुप्रीम कोर्टात सुनावणी 

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीने सिरीसेना यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवरच कोर्टाने नवे आदेश दिले आहेत. दरम्यान, संसद बरखास्त केल्यानंतर सिरीसेना यांनी ५ जानेवारी रोजी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती.

भारतीय बनावटीच्या जीसॅट – २९ दळवळण उपग्रहाचे आज प्रक्षेपण

चेन्नई : जीसॅट- २९ हा भारतीय बनावटीचा दळवळण उपग्रह आज सायंकाळी ५ वाजून ०८ मिनटांच्या सुमारास श्रीहरीकोट्यावरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्यासाठीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. दरम्यान, गाजा चक्रीवादळमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांचा विचार करुन, या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा अंतिम वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.
जीसॅट- २९ उपग्रह मध्ये का आणि कू बॅन्डचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पूर्वोत्तर आणि जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भागात सहज संपर्क साधण्यासाठी मदत होणार आहे. जीएसएलवी-एमके ३ डी २ रॉकेटचा वापर जीसॅट-२९ उपग्रहाच्या प्रक्षेपणसाठी करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती इस्त्रो संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. याच जीएसएलवी-एमके ३ डी २ रॉकेटचा वापर चंद्रयान २ आणि गगनयान मध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्षेपणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.