क्रोएशियाचा इंग्लडला जबरदस्त फटका

वृत्तसंस्था ऑनलाईन :

रशियामध्ये सुरु असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील तुल्यबळ प्रतिस्पर्धेमुळे लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत.इंग्लडला नमवत क्रोएशियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. क्रोएशियाने यासह ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.त्यामुळे क्रोएशियात आनंदाचे वातावरण आहे.

फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. फ्रान्सने याआधी १९९८ साली विजय प्राप्त केला होता.ब्रिटिश टीकाकारांनी क्रोएशियाच्या तुलनेत इंग्लंड खेळाडूंची शारीरिक क्षमता अधिक असल्याचे म्हटले होते. यावर क्रोएशियाने विजय प्राप्त करून टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e5dd4f6-8660-11e8-be1c-ebcb8186d8da’]

इंग्लंडमधील खासकरून स्ट्रायकर हॅरी केन, रहीम स्टर्लिंग यांसारख्या खेळाडूंकडून खूप अपेक्षा होत्या.यापूर्वी इंग्लंडने १९६६ मध्ये अंतिम सामन्यात बाजी मारली होती.त्यामुळे इंग्लडच्या आशा बऱ्याच उंचावल्या होत्या.पण क्रोएशियाने खूपच जबरदस्त खेळ करून सनसनाटी आगेकूच केली. त्यामुळे आता एक ऐतिहासिक अंतिम सामना होईल. रशिया आणि इंग्लंडविरुद्ध क्रोएशियाने आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. अंतिम सामना हा क्रोएशिया आणि फ्रान्स मध्ये असणार आहे. या सामन्यात क्रोएशिया नक्कीच इतिहास रचेल अशी आशा आहे. क्रोएशियाकडेही त्यांना टक्कर देणारे आक्रमक आहे तर फ्रान्सकडे कल्पक आक्रमक आहेत.

क्रोएशिया जिंकल्यास अनेक लहान देशांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावेल. त्यांनाही विश्वचषक जिंकण्याची मोठी प्रेरणा मिळेल. या रविवारी होणारा ‘ग्रँड फायनल’कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अंतिम सामना नक्कीच एक उच्च दर्जाचा सामना होईल.यात शंकाच नाही.