धक्कादायक! कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या १२ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या १२ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढून नेल्याची घटना सांगली जिल्ह्यातील डिग्रज गावात घडला. बहिण नदीवर कपडे धुत असताना तो पाण्याजवळ बसलेला असताना त्याला मगरीने पाण्यात ओढून नेले.

आकाश मारुती जाधव (वय १२) असे त्या मुलाचे नाव आहे.

आकाशचे वडील नदी काठावरील विटभट्टीवर काम करतात. गुरुवारी दुपारी त्याची बहिण नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी तो तिच्यासोबत तेथे गेला होता. तो पाण्याच्या काठावर बसलेला असताना अचानक त्याच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने त्याला पाण्यात ओढले. मगर एक तास त्याला तोंडात घेऊन फिरत होती. याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. परंतु त्याला शोधण्यात अजून यश आलेलं नाही.