मुठा नदीत ‘मगर’, पुण्यात ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातून वाहणाऱ्या या मुठा नदीत मगर दिसून आली असून ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरू नये, असा सावधानतेचा इशारा नांदेड ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे नांदेड व शिवणे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी कात्रज येथील तलावात काही वर्षापूर्वी मगर आढळली होती. त्यानंतर वारसगाव धरणातही काही मगर आढळली होती. पण खडकवासला धरणाच्या पुढील भागात मगर आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे खडकवासला धरणाच्या पुढील भागातील ओढ्या नाल्याच्या पाण्यामुळे मुठा नदीतील पाण्यात वाढ झाली होती.

खडकवासला धरणाच्या पुढे पुणे शहराकडे नदीच्या पात्रात नांदेड गावाजवळ नदीवर पुल आहे. हा पुल खाली असल्याने नदीच्या पाण्यात पाणी वाढले की हा पुल पाण्याखाली जातो. तरीही अनेकदा नागरिक, शाळकरी मुले या पुलावरुन थोडे पाणी वाहत असले तरी पुल पार करतात. या पुलाच्या परिसरात मगर आढळल्याने नांदेड ग्रामपंचायतीने नोटीस काढली आहे. त्यात नांदेड व शिवणे ग्रामस्थांनी नांदेड शिवणे नदीवरील पुलाच्या जवळ मोठी मगर असल्याचे आढळून आली आहे. त्यामुळे कोणीही आपली मुले व गावातील मच्छीमार लोकांनी नदी पात्रात उतरु नये, असे नांदेड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन देडगे यांनी सर्वांना कळविले आहे.

खडकवासला धरणातून यंदा अजूनही पाणी सोडलेले नाही. तरीही ही मगर आली कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा