‘या’ वयोगटातील लोक होतात ‘क्रोहन’ रोगाचे शिकार, ‘ही’ आहेत लक्षणे अन् कारणे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोक अनेक वेगवेगळ्या रोगांचे शिकार होत आहेत. त्यातील एक म्हणजे क्रोहन रोग. ही एक पचन तंत्रावर सूज येण्याची समस्या आहे. यात पचन तंत्राच्या कोणत्याही भागावर सूज येऊ शकते. पण जास्तकरून यात छोट्या किंवा मोठ्या आतड्या अधिक प्रभावित होतात. क्रोहन रोग हा पुरुष आणि महिला कुणालाही होऊ शकतो. तसेच कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार साधारणपणे 15 ते 35 या वयोगटातील तरुणांमध्ये अधिक बघायला मिळतो. मात्र, या आजाराच्या कारणांना नियंत्रित केलं तर हा आजार दूर होऊ शकतो.

क्रोहन आजाराची लक्षणं

या आजाराची फारच सामान्य लक्षणे आहेत.त्यात लूज मोशन, पोटात वेदना, वजन कमी होणे आणि त्वचेवर चट्टे किंवा लाल डाग पडणे ही आहेत. जर तुम्ही पोटात दुखत असेल विष्ठेतून रक्त येत असेल, वेगाने वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

क्रोहन आजाराची कारणे

इम्यून सिस्टीम- व्हायरस किंवा बॅक्टेरिया क्रोहन रोगाचं कारण ठरु शकतात. हा आजार त्या लोकांमध्ये अधिक बघितला जातो ज्यांच्या घरात हा आजार एखाद्या व्यक्तीला आधीच झाला असेल. हा आजार होण्याला धुम्रपान हे प्रमुख कारण आहे. तसेच इबुप्रोफेन, नेप्रोक्सेन सोडीयम, डायक्लोफेनाक सोडीयम नॉन स्टेरॉयडल अँटी इफ्लेमेटरी ड्रग क्रोहन रोगासाठी जबाबदार असतात. त्यासोबतच रिफाइंड आणि चरबीयुक्त पदार्थ सेवन केल्याने हा आजार होऊ शकतो.

क्रोहन आजारावर कसे करतात उपचार ?

या आजाराला दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सर्जरी करुनही यावर उपचार करतात. त्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. यात जो भाग प्रभावित झाला आहे तो कापून काढला जातो. तसेच यावर उपचार करण्यासाठी एक आर्टिफिशियल टेक्निकही शोधून काढली आहे.

कशी घ्यावी काळजी ?

– चरबी आणि फायबरचे जास्त प्रमाणात पदार्थ खाऊ नयेत. मसालेदार पदार्थ, मद्यसेवन आणि कॅफीन या आजाराचा धोका अधिक वाढवतात. यासाठी पाणी भरपूर प्यावे.

– मल्टी व्हिटॅमिन्स घ्या कारण क्रोहन रोग तुमच्या शरीरातील पोषक तत्वांचा प्रभाव कमी करु शकतो. कोणतंही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

– धुम्रपान बंद करा. कारण याने हा आजार होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच तणाव नियंत्रित करा. तणाव नियंत्रित करण्याला समस्या येत असेल तर व्यायाम करा.