home page top 1

काही ठिकाणी पडलेल्या गारा वळवाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर डांळींब, लिंबु, आंब्याच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. ग्राणीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी होर्डींग कोसळल्या.

धुळे जिल्ह्यात काल वळवाच्या पावसाने हजेरी लावली. त्यात काही ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळे पिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. तर शहरातही काल सांयकाळी वादळी वाऱ्यासह पाऊ पडला. त्यावेळी मालेगाव रोड गिंदोडिया कंम्पाऊंडमध्ये जिणमाता उत्सव कार्यक्रम सुरु असताना सभा मंडप कोसळला यात एकाच कुटुंबांतील चार जण जखमी झाले.

तर मालेगाव रोड अभय नगरातील आंब्याच्या झाडखाली उभ्या असलेल्या कारवर झाड कोसलळे. त्यात कारचे नुकसान झाले. तेथील रस्ता बंद झाला आहे. काल पासून काही ठिकाणी वीज तार तुटल्याने वीज पुरवठा देखील रात्रभर खंडित झाला होता. बाजार समितीत पथारीवर टाकलेल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading...
You might also like