Crop Insurance | पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग – कृषी आयुक्त सुनील चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Crop Insurance | राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आजपर्यंत ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Pik Vima Yojana In Maharashtra) सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी केले आहे. (Crop Insurance)

राज्यात विमा संरक्षित क्षेत्र ४२.३० लाख हेक्टर आहे. राज्याचे १ ते १७ जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून यावर्षी आत्तापर्यंत २९४.६० मिमी म्हणजे सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला असून ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. (Crop Insurance)

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून आजपर्यंत ८८.४४ लाख हेक्टरवर (६२ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

कापूस व सोयाबीनची ८३ टक्के पेरणी

राज्यात पेरणीच्या कामास वेग आला असून कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झाली आहे.
कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत.

राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत १०० टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे.
सद्यस्थितीत उपलब्ध ४८.३४ लाख मे. टन खतापैकी २१.३१ लाख मे. टन खतांची विक्री झाली असून २७.०३ लाख मे. टन खत उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी खत खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत.
कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 या क्रमांकावर संपर्क करावा,
असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title : Crop Insurance | 66 Lakh Farmers Participation in Crop Insurance Scheme – Agriculture Commissioner Sunil Chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका