कोट्यावधी शेतकर्‍यांना बसू शकतो ‘झटका’, पीक विमा योजनेचा वाढू शकतो ‘प्रिमीयम’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पिकांच्या विमा प्रीमियममध्ये सुधारणा केली जाऊ शकते. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. नवीन पीक विमा योजनेंतर्गत केंद्र सरकारने यामध्ये अनेक प्रमुख बदल केले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजना पीएम नरेंद्र मोदींनी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केली होती.

या योजनेंतर्गत अशा शेतकऱ्यांना पीक विमा घेणे सक्तीचे करण्यात आले होते जे शेतकरी कर्ज घेऊन शेती करीत आहेत. सध्या एकूण शेतकऱ्यांपैकी ५८ टक्के शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात.

तज्ञांना प्रीमियम वाढण्याची अपेक्षा

अ‍ॅग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AICIL) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मलय कुमार पोद्दार म्हणाले की, ‘आम्ही सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा करत आहोत. तथापि, मला वाटते की आपली उत्पादने आणि पीक विमा प्रीमियममध्ये बदल करावा लागेल.’ तसेच या सरकारी कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अशी कोणतीही माहिती दिली नाही की ज्याने प्रीमियम वाढेल की नाही याची माहिती मिळू शकेल. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की यास वाढवता येऊ शकते.

का वाढवल्या जातील किमती

आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका अन्य विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आता कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना देखील हे पर्यायी केले गेले आहे, अशात पीक विमा घेणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत घट होऊ शकते, ज्यामुळे अंडररायटींगची किंमत वाढू शकते.

एकाच कंपनीजवळ आहे पीक विम्याची जबाबदारी

सध्याच्या योजनेत, पीक विमा संरक्षणात पाच राइडर्स असतात, परंतु नवीन योजनेनुसार शेतकऱ्यांकडे पर्याय असेल की आपल्या गरजेनुसार ते निवडतील. देशात पीक विम्याचा परवाना (AICIL) च्या जवळच आहे. याच कंपनीने विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ची मंजूरी मागितली आहे जेणेकरून कृषी क्षेत्रातील इतर अनुलंब कंपन्यांसाठी काही उत्पादने बाजारात आणता येतील.

या भागात देखील आणला जाऊ शकतो विमा

कंपनीने ग्रामीण भागातील लोकांसाठी विमा उत्पादने बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच कंपनीची इच्छा आहे की आपली उत्पादने केवळ कृषी क्षेत्रापुरती मर्यादीत राहू नयेत. त्यासाठी आयआरडीएकडून आवश्यक मंजुरी मिळेल अशी पोद्दारांना आशा आहे. आता कंपनी शेती, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि शेतीचे उपकरणे देखील सादर करणार आहे.