दररोज 167 रूपये ‘बचत’ करा अन् ‘करोडपती’ बना, इथं होतोय खुप ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकवेळा व्यक्ती छोट्या रकमेची गुंतवणूक करत नाहीत. मोठी रक्कम आल्यानंतर आपण गुंतवणूक करू असा त्यांचा विचार असतो. मात्र तुम्ही दररोज केवळ 167 रुपये गुंतवणूक करून देखील करोडपती होऊ शकता. म्यूचुअल फंडच्या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवून याचा फायदा घेऊ शकता. आम्ही तुम्हाला आज याविषयी माहिती देणार आहोत.

SIP च्या माध्यमातून करा गुंतवणूक
SIP हा म्‍युचुअल फंडमधील सर्वात सुरक्षित मार्ग आहे. यामधून गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तसेच चांगले एवरेजिंग देखील मिळते, यामुळे तुमच्या गुंतवणुकीला धोका पोहोचत नाही. तसेच तुम्ही हवे तेव्हा यामधून माघार घेऊन तुमची रक्कम काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही. SIP च्या माध्यमातून लॉंग टर्म गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. बाकीच्या योजनांच्या तुलनेत यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. त्याचबरोबर करामध्ये देखील तुम्हाला सूट मिळते.

अशा पद्धतीने बना करोडपती
जर तुम्ही दररोज 167 रुपयांची बचत केली तर महिन्याला हि रक्कम 5,000 रुपये होते. हि रक्कम तुम्हाला SIP च्या माध्यमातून म्यूचुअल फंडच्या योग्य स्कीममध्ये गुंतवायची आहे. जर तुम्हाला यावर वार्षिक 12 टक्के परतावा मिळाला तर 28 वर्षात तुम्हाला 1.4 कोटी रुपये मिळणार आहेत. तर 30 वर्ष गुंतवणूक केल्यास 1.8 कोटी रुपये तर 35 वर्षांसाठी 3.24 कोटी रुपये मिळणार आहेत.

गुंतवणुकीवर ठेवा नजर
तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर यावर लक्ष ठेवा. यामध्ये वाढ होत असल्यास तुम्ही पुढे सुरु ठेवू शकता अन्यथा या योजनेतून माघार घेऊन तुम्ही पैसे दुसरीकडे गुंतवू शकता.

Visit : Policenama.com