मुलींना ‘सेक्स स्लेव’ बनवत होता ‘हा’ अब्जाधीश, जेलमध्ये केली आत्महत्या

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकेतील अब्जाधीश असलेल्या जेफ्री एप्सटीन याने कारागृहात आत्महत्या केली. जेफ्री याच्यावर अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्याला ४५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असतानाच त्यांने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २००२ ते २२०५ दरम्यान जेफ्रीने डझनभर मुलींवर लैंगिक अत्याचार केले तसेच त्याने बऱ्याच मुलींना सेक्स स्लेव (सेक्स गुलाम) म्हणून ठेवले होते.

Jeffrey-Epstein

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच मुलींचे वय अवघे १४ वर्षांचे होते. अमेरिकेच्या प्रस्थापीत लोकांसोबत अब्जाधीश जेफ्रीचे संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते ब्रिटनच्या राणीच्या कुटूंबापर्यंत माजी राष्ट्रपतींशी संबंधित लोकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच जेफ्रीच्या विरोधात काही नवीन पुरावे समोर आले आहेत.
Jeffrey-Epstein

जेफ्रीने कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या कारागृहात आत्महत्या केल्याने अनेकांनी संताप व्यक्त करून त्याला न्याय प्रक्रियेनुसार शिक्षा भोगता आली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जेफ्रीच्या कारागृहातील आत्महत्येचा तपास एफबीआय करत आहे. शनिवारी जेफ्रीने न्यूयॉर्क शहरातील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्य़ांच्या लक्षात आल्यानंतर जेफ्रीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले होते. त्यावर सेक्स ट्रॅफिकिंगचा आरोप होता. तो मुलींच्या मदतीने नव्या मुलींना जवळ बोलवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता.

जेफ्रीने आत्महत्या करण्याच्या २४ तास आगोदर न्यायालायने लैंगिक शोषण प्रकरणातील एक बंद लिफाफा उघडण्यात आला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. जेफ्रीच्या एका सेक्स स्लेवने पत्रात लिहले आहे की, समाजातील उच्च-भ्रू लोकांशी शारिरीक संबंध प्रस्थापीत करावे लागत होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like