नियोजित वधूची वफादारी तपासण्यासाठी ‘हा’ करोडपती देतोय 13 लाख अन् ‘अलिशान’ कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बेनामी उद्योगपतीने ‘प्रोफेशनल हनीट्रॅपर हायर करून आपल्या गर्लफ्रेंडच्या प्रामाणिकतेची गुप्तपणे चौकशी केली आहे. अनेकदा मुली फक्त पैश्यामुळेच मुलांशी लग्न करत असतात. त्यामुळे या उद्योगपतीने आपली गर्लफ्रेंड आपल्याबरोबर प्रामाणिक आहे किंवा नाही आणि ती आपल्यावर खरेच प्रेम करते का यासाठी हा हनीट्रॅपर लावला असून यासाठी तो मोठी रक्कम देखील खर्च करणार आहे. त्याचबरोबर हे काम करणाऱ्या व्यक्तीला तो आलिशान गाड्या देखील देणार आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बेनामी उद्योगपतीने HushHush या लग्जरी शॉपिंग आणि मार्केटप्लेस वेबसाइटवर ‘प्रोफेशनल हनीट्रॅपर हायर करण्यासाठी जागा सोडली आहे. मात्र ज्या मुलीसाठी तो ‘प्रोफेशनल हनीट्रॅपर हायर करता आहे त्या मुलीशी त्याचा साखरपुडा झालेला आहे. हा करोडपती मागील एक वर्षांपासून या नवीन मुलीच्या बरोबर असून त्याचा इतर मुलींबाबतचा अनुभव चांगला नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर साखरपुडा केलेल्या या मुलीशी आपण लग्नदेखील करणार असल्याचे त्याने सांगितले.

या वेबसाईटवर दिलेल्या अटींमध्ये उमेदवार हा धनवान दिसणारा हवा. त्याचबरोबर तो आकर्षक आणि तरूण हवा. या कामासाठी त्याला १३ लाख रुपये देण्यात येणार असून राहण्यासाठी शानदार फ्लॅट, आलिशान गाड्या आणि विशिष्ट बजेट मिळणार आहे.

दरम्यान, ज्या वेबसाईटवर त्याने यासाठी अर्ज दिला आहे त्या वेबसाईटचा संस्थापक हार्पिन याने म्हटले आहे कि, कुणी करोडपती व्यक्ती या गोष्टीसाठी अशी युक्ती वापरेल याचा विचारच कुणी केला नव्हता. त्याचबरोबर मला आशा आहे कि, तो उमेदवार त्या महिलेला पटविण्यात कामयाब न होवो.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like