…म्हणून कोटयाधीश उद्योजकाच्या पोरानं फक्त 30 हजारांसाठी केला 65 वर्षीय व्यक्तीचा खून

बंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन –   आपल्या अंगावर असणारं ३० हजारांचं कर्ज फेडण्यासाठी एका २२ वर्षांच्या तरुणाने ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची निर्घृण हत्या केल्याने बंगळुरुमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी राकेश नामक तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून खून केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश ज्येष्ठ नागरिक मूर्ती यांना ओळखत होता. राकेश श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्या वडिलांची सात कोटींची संपत्ती आहे. राकेशने अंगावरील दागिने लंपास करत पळ काढला. हे दागिने विकून आपल्या डोक्यावर असणारं ३० हजारांचं कर्ज त्याला फेडायचं होतं. १५ जानेवारी रोजी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश याने मूर्ती यांच्यावर पाठीमागून हल्ला केला आणि बॅटने वार केला. नंतर त्याच्या मानेवर वार केला आणि दागिने घेऊन पळ काढला.

राकेश याने झुडपांमध्ये मूर्ती यांचा मृतदेह टाकून देत घटनास्थळावरुन पळ काढला होता. घरी न परतल्याने मूर्ती यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी राकेशची चौकशी केली. यावेळी त्याने आपण हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.