Pune : पुणे स्टेशनवर सामान्य लोकांसाठी 30 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद

पुणे : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात कहर सुरू केला आहे. चारही बाजूला हाहाकार उडाला आहे. अशावेळी पुन्हा एकदा प्रवासी मजूर आपल्या घरांकडे मोठ्या संख्येने परतू लागले आहेत, ज्यामुळे आता ट्रेनमध्ये गर्दी होऊ लागली आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक स्पेशल ट्रेनसुद्धा चालवल्या जात आहेत. यातून रिझर्व्हेशननंतर तुम्ही सहज घरी पोहचू शकता, परंतु तरीसुद्धा स्टेशनवर गर्दी दिसत आहे. मात्र, या दरम्यान रेल्वेने लोकांना अस्वस्थ होऊ नका आणि रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. सोबतच पुणे स्टेशनवर सामान्य लोकांसाठी 30 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद केले आहे.

मुंबई, पुणेसारख्या शहरातून गावी जाणार्‍या लोकांची कारणे सुद्धा वेगवेगळी आहेत. कुणी म्हणते उन्हाळा सुरू झाला आहे, तर कुणाच्या घरी लग्नसोहळा आहे, यासाठी जाणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबासोबत लहान-लहान मुलांना घेऊन लोक प्रवास करत आहेत.

30 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट नाही
कोरोना महामारीमुळे सध्यस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे रेल्वे मंडल सर्व आवश्यक पावले उचलत आहे. स्टेशन तसेच ट्रेनमध्ये व्यवस्था राखण्यासाठी तिकीट चेकिंग, आरपीएफ, तिकिट बुकिंग स्टाफ काम करत आहे. पुणे रेल्वे मंडलाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये. पुणे स्टेशनवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफार्म तिकिट देणे बंद केले आहे. प्लॅटफॉर्म तिकिट केवळ ज्येष्ठ, दिव्यांग, रूग्ण आणि गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने रु.50/-च्या दराने जारी केले जात आहे.

या ट्रेनच्या फेर्‍या रद्द
तांत्रिक करणामुळे विशेष गाडी क्रमांक 01029/01030 कोल्हापुर – मुंबई – कोल्हापुर कोयना एक्सप्रेसच्या पाच फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. 18, 20, 22, आणि 24 एप्रिलला विशेष गाडी क्रमांक 01029 मुंबई – कोल्हापुर कोयना एक्सप्रेस तसेच दिनांक 17, 19, 21, 23 आणि 25 एप्रिलला विशेष गाडी क्रमांक 01030 कोल्हापुर – मुंबई रद्द राहील.