सरकारी नोकरी ! CRPF च्या 1412 हेड कॉन्स्टेबल पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पुरुष / महिला कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी / बुग्लर / माळी /) या तब्बल 1412 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आज 05 मार्च 2020 अंतिम तारीख असल्याने तातडीने अर्ज दाखल करावे. यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर भेट देऊन अर्ज करावा.

पुरुषांसाठी पद :
सामान्य वर्ग – 1031
अनुसूचित जाती वर्ग – 200
एसटी वर्ग – महिलांसाठी 100 पदे
सामान्य वर्ग – 63
अनुसूचित जाती वर्ग – 12

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच अर्ज करणार्‍या उमेदवारांचे कमाल वय 32 वर्षे असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 05 मार्च 2020 आहे. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 25500 – 81100 रुपये पगार देण्यात येईल.

कशी होणार निवड :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल मेजरमेंट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, टेस्‍ट‍िमोनियल टेस्ट , वैद्यकीय चाचणी आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना LDCE कोर्समध्ये जावे लागेल आणि त्यांना दोन वर्षांच्या प्रोबेशन पीरियडमध्ये रहावे लागेल.