धक्कादायक ! पहिल्यांदा पत्नी आणि मुला-मुलीला गोळी झाडून संपवलं, नंतर CRPF जवानानं गळफास घेऊन केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रयागराजमध्ये दोन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येचे प्रकरण अजूनही शांत झाले नाही तर लगेच आणखी एका धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी सीआरपीएफच्या जवानानं पत्नी, मुलगा आणि मुलीला पिस्तुलाने गोळ्या घालून ठार मारलं. या जवानानं आधी तिघांना मध्यवर्ती सुरक्षा पोलिस दलाच्या छावणीत बांधलेल्या क्वार्टरमध्ये ठार मारलं आणि मग त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोळीचा आवाज ऐकताच आसपासच्या क्वार्टरमध्ये राहणारे लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराच्या खोलीचे दृश्य पाहून त्यांच्या पायखालची जमीन सरकली. जमिनीवर आई, मुलगा आणि मुलीचा रक्ताने भरलेला मृतदेह पडलेला होता आणि वडील पंख्याला लटकले होते. घाईघाईने सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती सिव्हिल पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आज पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने प्रयागराज हादरले आहेत. खरं तर, सिरसा मेजा येथे राहणारा विनोदकुमार यादव आपली पत्नी विमला यादव, मुलगा संदीप यादव आणि मुलगी सिमरन यादव यांच्यासह थरवई पोलिस स्टेशन परिसरातील पडिला महादेव येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणी कार्यालयात पाईप टूच्या क्वार्टरमध्ये राहत होते. तो सीआरपीएफमध्ये ड्रायव्हर म्हणून तैनात होता. शनिवारी सकाळी विनोदने स्वत: च्या परवानाधारक पिस्तूलमधून पत्नी विमला यादव, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार मारले आणि पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला दिली आहे. ही बातमी मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. ही बातमी समजताच केंद्रीय सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी लखनऊहून प्रयागराजला रवाना झाले असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होईल. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.