रायफलमधून चुकून गोळी सुटल्यानं CRPF जवानाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सीआरपीएफ जवानाच्या रायफलमधून चुकून सुटलेली गोळी लागून एका जवानाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.22) सायंकाळी अल्टामाऊंट रोडवरून नवरंग सोसायटीकडे जाणाऱ्या पाटणवाला रोडवर घडली. देवदन रामभाई बकोत्रा (वय-30) असे मृत्यू झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव असून बकोत्रा हे मुळचे गुजरातचे आहेत. या प्रकरणाची गावदेवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेसाठी देवदन बकोत्रा हे तैनात होते. त्यांच्या रायफलमधून चुकून सुटलेल्या गोळीमुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या रायफलमधून गोळी सुटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने आत्महत्या केली आहे का या दृष्टीकोनातून पोलीस तपास करत आहेत.

देवदन बकोत्रा हे पेडर रोडवरील मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टेलिया निवासस्थानाजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते. 2014 मध्ये ते सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते. मुकेश अंबानी यांची व्हीआयपी सुरक्षा झेड प्लस आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) कडे सोपवण्यात आली आहे. याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like