J & K : दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण !

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता उपचारादरम्यान त्या जवानाचं निधन झाल्याचं वृत्त आहे. नरेश उमराव बडोले असं या जवानाचं नाव आहे. आज दहशतवादी हल्ल्यात शत्रुशी लढताना नरेश बडोले यांना वीरमरण आलं आहे.

त्यांची सर्व्हीस रायफल देखील दहशतवाद्यांनी सोबत नेली होती. पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये सीआरपीएफच्या 117 व्या बटालीयनमधील एक जवानावर गोळी झाडली. दहशतवादी त्यांची सर्व्हीस रायफल (ए के रायफल) सोबत घेऊन गेले. यानंतर जवानाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

नरेश बडोले हे नागपूरचे रहिवाशी होते. त्यांचंही लग्नही झालं होतं. त्यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like