CRPF च्या जवानाने आपल्याच साथीदारांवर झाडल्या गोळ्या , एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या छावणीत सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्या साथीदारांवर फायरिंग केली. ज्यात एका जवानाचा मृत्यू झाला तर दुसरा जवान जखमी झाला आहे. त्यांनतर फायरिंग केलेल्या जवानाने स्वतः ला गोळी मारली. या जवानाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. याप्रकरणाची माहिती सीआरपीएफने दिली. त्याचवेळी पोलिसांनी सांगितले कि, मानसिक आरोग्या संबंधित उपचार घेत असलेल्या अपराधीने कथितपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत नंतर स्वत: वर गोळी झाडून घेतली.

पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले, ‘ही घटना सेसरपोर पोलिस स्टेशन परिसरातील सेडवा गावात सीआरपीएफच्या 241 व्या’ बस्तरिया ‘बटालियनच्या छावणीत सकाळी 8 वाजता घडली. 25 वर्षीय कॉन्स्टेबल गिरीश कुमार, ज्याला मानसिक समस्येच्या उपचारांसाठी छावणीच्या एका वेगळ्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते, त्याने आपल्या सहकाऱ्याकडून एक रायफल हिसकावून घेतली आणि इतर कर्मचार्‍यांवर गोळीबार केला.

ते म्हणाले, ‘त्यात 27 वर्षीय कॉन्स्टेबल प्रमोद कुमार यांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक 26 वर्षीय हवालदार संतोष वाछम जखमी झाले. त्यानंतर कुमार यांनी स्वत: वर गोळी झाडली आणि ते गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमी जवानांना जगदलपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना रायपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे समजते. घटनेमागील हेतूचा शोध घेतला जात आहे. नक्षलविरोधी कारवाया करण्यासाठी बस्तर प्रदेशात मोठ्या संख्येने सीआरपीएफ तैनात आहेत.