CRPF च्या जवानांकडून ‘कोरोना’बाधितांसाठी ’प्लाझ्मा’ दान !

पोलिसनामा ऑनलाईन – सीआरपीएफच्या ज्या जवानांनी कोरोनावर मात केली आहे, अशा जवानांचा प्लाझ्मा बाधितांसाठी दान करण्यात येत आहे. कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आणि वाढती संख्या अटोक्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठीच ‘प्लाझ्मा’ थेरपीचा देखील वापर केला जात आहे.

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ‘प्लाझ्मा’ दान केल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. देशसेवेचा हा आणखी एक मार्ग आहे, असे या जवानांनी म्हटले आहे. सीआरपीएफचे 139 जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत तिघांनी प्लाझ्मा दान केले आहे व आणखी देखील यासाठी इच्छुक आहेत. अशी माहिती सीआरपीएफच्या 31 बटालियनचे कमांडंट दिपेंद्र राजपूत यांनी सांगितले आहे. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रुग्णाला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाझ्मा थेरपीमध्ये करोनातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. असे जवानांनी सांगितले.